योहानने सांगितलेला संदेश १७:१-२६

  • प्रेषितांसोबत येशूची शेवटची प्रार्थना (१-२६)

    • सर्वकाळाच्या जीवनासाठी देवाला ओळखणं आवश्‍यक ()

    • ख्रिस्ती लोक जगाचे भाग नाहीत (१४-१६)

    • “तुझं वचन सत्य आहे” (१७)

    • “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” (२६)

१७  या गोष्टी बोलल्यानंतर, वर आकाशाकडे पाहून येशू म्हणाला: “बापा, वेळ आली आहे. मुलाने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या मुलाचा गौरव कर.+ २  जे तू त्याला दिले आहेत त्या सगळ्यांना+ त्याने सर्वकाळाचं जीवन द्यावं,+ म्हणून तू सर्व मानवांवर त्याला अधिकार दिलाय.+ ३  सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+ ४  तू मला दिलेलं कार्य पूर्ण करून+ मी पृथ्वीवर तुझा गौरव केलाय.+ ५  म्हणून बापा, हे जग अस्तित्वात येण्याआधी, तुझ्याजवळ असताना मला जसा गौरव मिळत होता,+ तसाच गौरव आताही तू मला तुझ्याजवळ दे. ६  जे लोक तू मला या जगातून दिले होते, त्यांना मी तुझं नाव प्रकट* केलंय.+ ते तुझे होते आणि ते तू मला दिले आणि त्यांनी तुझं वचन पाळलंय.* ७  जे काही तू मला दिलंय ते तुझ्यापासूनच आहे, हे आता त्यांना समजलंय. ८  कारण तू मला सांगितलेल्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या आहेत.+ त्यांनी त्या स्वीकारल्या आहेत आणि मी तुझ्या वतीने आलो, याची त्यांना पक्की खातरी झाली आहे.+ आणि तूच मला पाठवलं यावर त्यांनी विश्‍वास ठेवलाय.+ ९  मी त्यांच्यासाठी विनंती करतो. मी ही विनंती जगासाठी नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो, कारण ते तुझे आहेत. १०  जे काही माझं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं, ते माझं आहे+ आणि त्यांच्यामध्ये माझा गौरव करण्यात आलाय. ११  मी यापुढे जगात नाही, कारण मी तुझ्याकडे येतोय, पण ते जगात आहेत.+ पवित्र बापा, तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांना सांभाळ.+ म्हणजे जसं आपण एक* आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं.*+ १२  मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा तू मला दिलेल्या तुझ्या स्वतःच्या नावासाठी मी त्यांना सांभाळायचो.+ मी त्यांचं संरक्षण केलंय आणि नाशाच्या मुलाला सोडून+ त्यांच्यापैकी एकाचाही नाश झाला नाही.+ याद्वारे शास्त्रवचन पूर्ण व्हावं म्हणून हे घडलं.+ १३  पण आता मी तुझ्याकडे येतोय आणि माझ्यासारखंच त्यांचंही मन आनंदाने भरून जावं, म्हणून मी जगात असतानाच या गोष्टी त्यांना सांगतोय.+ १४  मी तुझं वचन त्यांना दिलंय, पण जगाने त्यांचा द्वेष केलाय. कारण जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत.+ १५  तू त्यांना या जगातून काढून घे अशी मी विनंती करत नाही, तर त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ, अशी विनंती करतो.+ १६  जसा मी जगाचा भाग नाही,+ तसे तेही जगाचा भाग नाहीत.+ १७  सत्याद्वारे त्यांना पवित्र कर;*+ तुझं वचन सत्य आहे.+ १८  जसं तू मला जगात पाठवलं, तसं मीही त्यांना जगात पाठवलं.+ १९  आणि त्यांनीही सत्याद्वारे पवित्र व्हावं, म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतोय. २०  मी फक्‍त यांच्यासाठीच विनंती करतो असं नाही, तर जे यांच्या वचनाद्वारे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीही मी विनंती करतो. २१  त्या सर्वांनी एक व्हावं+ म्हणून मी ही विनंती करतो. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहेस आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे,+ तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं. यामुळे जग विश्‍वास ठेवेल की तू मला पाठवलंय. २२  जसं आपण एक आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं+ म्हणून तू जो गौरव मला दिलास, तो मी त्यांना दिलाय. २३  मी त्यांच्यासोबत आणि तू माझ्यासोबत ऐक्यात असल्यामुळे त्यांनीही पूर्णपणे एक* असावं. म्हणजे जगाला हे समजेल, की तू मला पाठवलं आणि जसं तू माझ्यावर प्रेम केलं तसं त्यांच्यावरही केलं. २४  बापा, जे लोक तू मला दिले आहेत त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्यासोबत असावं, अशी माझी इच्छा आहे.+ म्हणजे जो गौरव तू मला दिला आहेस तो गौरव ते पाहतील, कारण जगाच्या स्थापनेच्या आधीपासून तू माझ्यावर प्रेम केलंस.+ २५  नीतिमान बापा, जगाने खरंच तुला ओळखलं नाही.+ पण मी तुला ओळखतो+ आणि तू मला पाठवलं हे त्यांनाही समजलंय. २६  मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय आणि पुढेही करीन.+ तुझं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांच्यामध्ये असावं आणि मी त्यांच्यासोबत ऐक्यात असावं, म्हणून मी ते प्रकट करीन.”+

तळटीपा

किंवा “ज्ञान घेणं.”
किंवा “जाहीर.”
किंवा “तुझ्या शिकवणींचं पालन केलंय.”
किंवा “एकतेत असावं.”
किंवा “एकतेत.”
किंवा “तुझ्या सेवेसाठी वेगळं कर.”
किंवा “एकतेत.”