विलापगीत ५:१-२२
५ हे यहोवा, आमच्यावर आलेलं संकट आठव.
आमचा किती अपमान झालाय, ते पाहा.+
२ आमचा वारसा परक्यांच्या हाती; आमची घरं विदेश्यांच्या हाती देण्यात आली आहेत.+
३ आम्ही वडील नसलेल्या अनाथ मुलांसारखे झालो आहोत; आमच्या आया विधवांसारख्या झाल्या आहेत.+
४ आमचंच पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं+ आणि आमच्याच लाकडासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते.
५ आमचा पाठलाग करणारे आमच्या मानेवर बसले आहेत;आम्ही थकून गेलो आहोत, आम्हाला विश्रांती मिळत नाही.+
६ पुरेसं अन्न मिळावं म्हणून आम्ही इजिप्तपुढे*+ आणि अश्शूरपुढे हात पसरतो.+
७ ज्यांनी पाप केलं, ते आमचे वाडवडील आता जिवंत नाहीत, पण त्यांच्या अपराधांची शिक्षा आम्ही भोगतोय.
८ आता सेवक आमच्यावर राज्य करत आहेत; आम्हाला त्यांच्या हातून सोडवणारं कोणीही नाही.
९ ओसाड रानातल्या तलवारीमुळे, आम्ही आपला जीव धोक्यात घालून अन्न मिळवतो.+
१० भुकेने आम्ही व्याकूळ झाल्यामुळे, आमची त्वचा भट्टीसारखी तापली आहे.+
११ सीयोनमधल्या स्त्रियांची, यहूदाच्या शहरांतल्या कुमारींची त्यांनी अब्रू लुटली आहे.+
१२ अधिकाऱ्यांना हाताने लटकवण्यात आलं;+ वडीलजनांना जराही आदर दाखवण्यात आला नाही.+
१३ तरुण माणसं जातं उचलतात आणि लाकडांच्या ओझ्यामुळे लहान मुलं अडखळतात.
१४ वडीलजन शहराच्या फाटकांमधून निघून गेले आहेत;+ तरुण आपली वाद्यं वाजवत नाहीत.+
१५ आमच्या मनातला आनंद हरवला आहे; आमचं नाचगाणं शोकात बदललं आहे.+
१६ आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आम्ही पाप केलंय, आमचा धिक्कार असो!
१७ यामुळे आमच्या मनाला यातना होत आहेत,*+आणि या गोष्टींमुळे आमची दृष्टी अंधूक झाली आहे.+
१८ सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे,+ आता तिथे कोल्हे फिरतात.
१९ हे यहोवा, तू तर तुझ्या राजासनावर सर्वकाळासाठी विराजमान आहेस.
तुझं राजासन पिढ्या न् पिढ्या टिकून राहील.+
२० तू आम्हाला कायमचं का विसरतोस? तू आम्हाला इतका काळ का टाकून देतोस?+
२१ हे यहोवा, आम्हाला तुझ्याकडे परत आण; आम्ही आनंदाने तुझ्याकडे परतू.+
आमचे पूर्वीचे दिवस परत आण.+
२२ पण तू तर आम्हाला पूर्णपणे झिडकारलं आहेस.
तू आमच्यावर खूप संतप्त आहेस.+