स्तोत्रं ११:१-७
दावीदचं गीत. संचालकासाठी.
११ मी यहोवाचा आश्रय घेतलाय.+
तर मग, तुम्ही मला कसं म्हणू शकता:
“पक्ष्याप्रमाणे आपल्या पर्वतावर उडून जा!
२ सरळ मनाच्या लोकांना मारण्यासाठी,दुष्ट अंधारात कसं आपलं धनुष्य वाकवतातआणि आपला बाण ताणतात, ते पाहा.
३ जर पायाच* ढासळला असेल,तर नीतिमानांनी काय करावं?”
४ यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे.+
यहोवाचं राजासन स्वर्गात आहे.+
त्याचे डोळे मानवांना पाहतात; त्याचे तेजस्वी डोळे* त्यांचं परीक्षण करतात.+
५ यहोवा नीतिमानासोबतच दुष्टाचंही परीक्षण करतो;+हिंसाचाराची आवड असलेल्यांचा तो द्वेष करतो.+
६ तो दुष्टांवर संकटांचा* वर्षाव करेल;त्यांच्या प्याल्यात आग, गंधक+ आणि होरपळणारा* वारा असेल.
७ कारण यहोवा नीतिमान आहे;+ त्याला नीतिमान कार्यं आवडतात.+
सरळ मनाच्या लोकांवर त्याची कृपा होईल.*+
तळटीपा
^ किंवा “न्यायाचा पायाच.”
^ किंवा “त्याची सावध नजर.”
^ शब्दशः “पाश.” किंवा कदाचित, “पेटलेले कोळसे.”
^ किंवा “उष्ण.”
^ शब्दशः “त्याचा चेहरा पाहतील.”