स्तोत्रं ३७:१-४०
दावीदचं गीत.
א [आलेफ ]
३७ दुष्ट माणसांमुळे संतापू नकोसकिंवा दुर्जनांचा हेवा करू नकोस.+
२ ते पाहता पाहता गवतासारखे सुकून जातील+आणि कोवळ्या, हिरव्यागार गवतासारखे कोमेजून जातील.
ב [बेथ ]
३ यहोवावर भरवसा ठेव आणि चांगलं ते कर;+देशात* राहा आणि विश्वासूपणे वाग.+
४ यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान,म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल.
ג [गिमेल ]
५ आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे;+त्याच्यावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.+
६ तो तुझं नीतिमत्त्व पहाटेच्या प्रकाशासारखंआणि तुझा न्याय दुपारच्या उन्हासारखा चमकू देईल.
ד [दालेथ ]
७ यहोवापुढे शांत राहा+आणि आतुरतेने* त्याची वाट पाहा.
आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्या माणसामुळेसंतापू नकोस.+
ה [हे ]
८ राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक;+संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.*
९ कारण दुष्ट लोकांचा नाश होईल,+पण जे यहोवाची आशा धरतात त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+
ו [वाव ]
१० थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील;+त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस,तरी ते तुला सापडणार नाहीत.+
११ पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.+
ז [झाइन ]
१२ दुष्ट माणूस नीतिमानाविरुद्ध षड्यंत्र करतो;+तो त्याच्यावर दातओठ खातो.
१३ पण यहोवा त्या दुष्टावर हसेल,कारण त्याच्या नाशाचा दिवस येणार, हे त्याला माहीत असतं.+
ח [हेथ ]
१४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना खाली पाडण्यासाठी;सरळ मार्गाच्या लोकांची कत्तल करण्यासाठी,दुष्ट आपल्या तलवारी उपसतात आणि आपली धनुष्यं ताणतात.
१५ पण त्यांची तलवार त्यांच्याच हृदयात शिरेल;+त्यांची धनुष्यं मोडून टाकली जातील.
ט [तेथ ]
१६ नीतिमानाजवळ थोडं थोडकंच असलं,तरी बऱ्याच दुष्ट लोकांच्या समृद्धीपेक्षा ते चांगलं आहे.+
१७ कारण दुष्टांचे हात तोडून टाकले जातील,पण नीतिमानांना यहोवा आधार देईल.
י [योद ]
१८ निर्दोष माणसांच्या परिस्थितीची* यहोवाला जाणीव असते,त्यांचा वारसा सर्वकाळ टिकून राहील.+
१९ संकटाच्या काळात त्यांना लज्जित व्हावं लागणार नाही;दुष्काळातही त्यांच्याजवळ भरपूर अन्न असेल.
כ [खाफ ]
२० पण दुष्टांचा नाश होईल;+यहोवाचे शत्रू कुरणांतल्या हिरव्यागार गवतासारखे सुकून जातील;ते धुरासारखे नाहीसे होतील.
ל [लामेद ]
२१ दुष्ट माणूस उसनं घेऊन परत देत नाही,पण नीतिमान माणूस मोठ्या मनाचा* आणि उदार असतो.+
२२ देव ज्यांना आशीर्वाद देतो त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल,पण तो ज्यांना शाप देतो त्यांचा नाश होईल.+
מ [मेम ]
२३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+
२४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+
נ [नून ]
२५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+
२६ तो गरजूंना नेहमी उदारपणे मदत करतो,+त्याच्या मुलाबाळांना देवाकडून आशीर्वाद मिळतात.
ס [सामेख ]
२७ वाइटापासून फिरून चांगलं ते कर,+म्हणजे तू सर्वकाळ टिकून राहशील.
२८ कारण यहोवा न्यायप्रिय आहे,तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+
ע [आयन ]
ते नेहमी सुरक्षित राहतील;+पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+
२९ नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.+
פ [पे ]
३० नीतिमान माणसाच्या तोंडून बुद्धीचे बोल निघतात,*त्याची जीभ न्यायाबद्दल सांगते.+
३१ देवाचं नियमशास्त्र त्याच्या हृदयात असतं.+
त्याची पावलं कधीही अडखळणार नाहीत.+
צ [सादे ]
३२ दुष्ट माणूस नीतिमानावर टपलेला असतो,त्याचा जीव घेण्याची तो संधी शोधत असतो.
३३ पण यहोवा नीतिमानाला त्याच्या हाती देणार नाही;+न्याय करताना तो नीतिमानाला दोषी ठरवणार नाही.+
ק [खुफ ]
३४ यहोवाची आशा धर आणि त्याच्या मार्गावर चाल,म्हणजे तो तुझा गौरव करून तुला पृथ्वीचा वारसा देईल.
दुष्टांचा नाश होईल,+ तेव्हा तू पाहशील.+
ר [रेश ]
३५ मी दुष्ट आणि क्रूर माणसाला,आपल्या मातीत जोमाने वाढणाऱ्या हिरव्यागार झाडासारखं बहरताना पाहिलंय.+
३६ पण तो अचानक गेला आणि कायमचा नाहीसा झाला;+मी त्याला शोधत राहिलो, तरी तो सापडला नाही.+
ש [शिन ]
३७ निर्दोष माणसाकडे* लक्ष देआणि सरळ मनाच्या माणसाला+ पाहा,कारण त्याला भविष्यात शांती लाभेल.+
३८ पण सर्व अपराध्यांचा नाश केला जाईल;दुष्टांच्या भविष्याचा अंत होईल.+
ת [ताव ]
३९ यहोवा नीतिमानांचं तारण करतो;+संकटाच्या काळात तो त्यांचा दुर्ग होतो.+
४० यहोवा त्यांना साहाय्य करेल आणि त्यांची सुटका करेल.+
त्यांना दुष्टांच्या हातून सोडवून, तो त्यांचा बचाव करेल,कारण ते त्याचा आश्रय घेतात.+
तळटीपा
^ किंवा “पृथ्वीवर.”
^ किंवा “धीराने.”
^ किंवा कदाचित, “संतापू नकोस, कारण त्यामुळे वाईटच परिणाम होईल.”
^ शब्दशः “निर्दोष माणसांच्या दिवसांची.”
^ किंवा “कृपाळू.”
^ किंवा “स्थिर करतो.”
^ किंवा “भाकरीसाठी.”
^ किंवा “नीतिमान माणूस हळू आवाजात बुद्धीच्या गोष्टी बोलतो.”
^ किंवा “खरेपणाने चालणाऱ्याकडे.”