स्तोत्रं ९१:१-१६
९१ जो सर्वोच्च देवाच्या गुप्त ठिकाणी आश्रय घेतो,+तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.+
२ मी यहोवाला म्हणीन: “तू माझा आश्रय, माझा दुर्ग आहेस,+तू माझा देव आहेस, तुझ्यावर मी भरवसा ठेवतो.”+
३ कारण तो तुला फासेपारध्याच्या सापळ्यापासून;जीवघेण्या रोगापासून वाचवेल.
४ तो आपल्या पंखांनी तुला झाकेलआणि त्याच्या पंखांखाली तुला संरक्षण मिळेल.+
त्याचा विश्वासूपणा+ तुझ्यासाठी मोठ्या ढालीसारखा+आणि संरक्षण देणाऱ्या भिंतीसारखा* असेल.
५ तुला रात्रीच्या वेळी घडणाऱ्या भयानक गोष्टींची,+किंवा दिवसा सुटणाऱ्या बाणाची भीती वाटणार नाही.+
६ काळोखात पाठलाग करणाऱ्या साथीच्या रोगाला,किंवा भरदुपारी होणाऱ्या नाशाला तू भिणार नाहीस.
७ तुझ्या बाजूला हजार माणसंआणि तुझ्या उजव्या हाताला दहा हजार माणसं मरून पडतील,पण तुझ्यावर मात्र यांपैकी कोणतंही संकट येणार नाही.+
८ तू फक्त आपल्या डोळ्यांनी हे पाहशील;दुष्टांना तुझ्या डोळ्यांदेखत शिक्षा* मिळालेली तू पाहशील.
९ कारण “यहोवा माझा आश्रय आहे,” असं तू म्हणालास;सर्वोच्च देवाला तू आपलं निवासस्थान* मानलं आहेस.+
१० तुझ्यावर कोणतंही संकट कोसळणार नाही+आणि कोणतीही पीडा तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
११ कारण तू जिथेही जाशील, तिथे तुझं संरक्षण करावं,+अशी तो आपल्या स्वर्गदूतांना+ तुझ्याबद्दल आज्ञा देईल.
१२ तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये,+म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.+
१३ तू तरुण सिंहावर आणि नागावर पाय देशील;तू आयाळ असलेल्या सिंहाला आणि मोठ्या सापाला पायांखाली तुडवशील.+
१४ देव म्हणाला: “मी त्याला वाचवीन, कारण त्याला माझ्याबद्दल जिव्हाळा आहे.*+
मी त्याचं रक्षण करीन, कारण त्याला माझ्या नावाची ओळख आहे.*+
१५ तो मला हाक मारेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन.+
संकटाच्या वेळी मी त्याच्यासोबत असेन.+
मी त्याला वाचवीन आणि त्याचा सन्मान करीन.
१६ मी त्याला मोठं आयुष्य देऊन तृप्त करीन+
आणि माझी तारणाची कार्यं* त्याला दाखवीन.”+
तळटीपा
^ किंवा “तटबंदीसारखा.”
^ शब्दशः “प्रतिफळ.”
^ किंवा कदाचित, “गड; आश्रय.”
^ शब्दशः “तो मला जडून राहतो.”
^ किंवा “माझं नाव कबूल करतो.”
^ किंवा “माझ्याकडून मिळणारं तारण.”