१ इतिहास २६:१-३२
२६ मंदिराच्या द्वारपालांचे+ गट हे: कोरहच्या वंशजांपैकी मशेलेम्याह;+ तो कोरेचा मुलगा होता आणि कोरे हा आसाफच्या मुलांपैकी होता.
२ मशेलेम्याहची मुलं ही: प्रथमपुत्र जखऱ्या, दुसरा यदीएल, तिसरा जबद्याह, चौथा यथनिएल,
३ पाचवा एलाम, सहावा यहोहानान आणि सातवा एल्याहो-वेनय.
४ ओबेद-अदोमची मुलं ही: प्रथमपुत्र शमाया, दुसरा यहोजाबाद, तिसरा यवाह, चौथा साखार, पाचवा नथनेल,
५ सहावा अम्मीएल, सातवा इस्साखार आणि आठवा पउलथय. अशा प्रकारे देवाने ओबेद-अदोमला आशीर्वादित केलं.
६ त्याचा मुलगा शमाया याची मुलं आपापल्या घराण्यांचे प्रमुख बनले. कारण ते ताकदवान असून भरवशालायक पुरुष होते.
७ शमायाची मुलं ही: अथनी, रफाएल, ओबेद आणि एलजाबाद; आणि त्यांचे भाऊ अलीहू व समख्या हेसुद्धा भरवशालायक पुरुष होते.
८ ही सर्व ओबेद-अदोमची मुलं होती. ते, त्यांची मुलं आणि त्यांचे भाऊ हे सर्व जण भरवशालायक असून सेवेसाठी योग्य असे पुरुष होते. ओबेद-अदोमच्या घराण्यातले असे एकूण ६२ जण होते.
९ आणि भरवशालायक असलेली मशेलेम्याहची+ मुलं व त्याचे भाऊ असे १८ जण होते.
१० मरारीच्या मुलांपैकी होसा याची मुलं ही: प्रमुख असलेला शिम्री; तो प्रथमपुत्र नसला तरी त्याच्या वडिलांनी त्याला प्रमुख म्हणून नेमलं.
११ दुसरा हिल्कीया, तिसरा तबल्याह आणि चौथा जखऱ्या. होसाची मुलं व त्याचे भाऊ असे एकूण १३ जण होते.
१२ द्वारपालांच्या या गटांमध्ये असलेले प्रमुखही आपल्या भावांप्रमाणेच यहोवाच्या मंदिरात सेवा करायचे.
१३ म्हणून त्यांच्यातल्या छोट्या आणि मोठ्या अशा सगळ्या घराण्यांनी प्रत्येक दरवाजासाठी चिठ्ठ्या टाकल्या.+
१४ तेव्हा पूर्वेकडच्या दरवाजासाठी शलेम्याहच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याचा मुलगा जखऱ्या याच्या नावाची चिठ्ठी टाकली, तेव्हा ती उत्तरेकडच्या दरवाजासाठी निघाली. जखऱ्या हा एक सुज्ञ सल्लागार होता.
१५ दक्षिणेकडच्या दरवाजासाठी ओबेद-अदोमच्या नावाची चिठ्ठी निघाली. आणि त्याच्या मुलांवर+ कोठारांची कामं सोपवण्यात आली.
१६ पश्चिमेच्या दरवाजासाठी शुप्पीम आणि होसा+ यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. हा दरवाजा वर जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या ‘शल्लेकेथ फाटकाजवळ’ होता. आणि रक्षकांचे गट एकमेकांजवळ होते.
१७ पूर्वेकडच्या दरवाजाजवळ सहा लेवी; उत्तरेकडच्या दरवाजाजवळ दररोज चार लेवी, दक्षिणेकडच्या दरवाजाजवळ दररोज चार लेवी आणि कोठारांसाठी दोन-दोन लेवी पहारा देण्यासाठी नेमण्यात आले.+
१८ पश्चिमेकडे असलेल्या वऱ्हांड्यासाठी महामार्गाजवळ चार लेवी,+ तर वऱ्हांड्याजवळ दोन लेवी नेमण्यात आले.
१९ द्वारपालांचे हे गट, कोरह आणि मरारी यांच्या वंशजांतले होते.
२० लेव्यांपैकी अहीया हा खऱ्या देवाच्या मंदिरातल्या भांडारांवरचा आणि पवित्र केलेल्या* वस्तूंच्या भांडारांवरचा अधिकारी होता.+
२१ लादानची मुलं ही: यहीएली (हा लादानच्या मुलांपैकी, म्हणजे गेर्षोनी लादानच्या मुलांपैकी होता. तो लादानच्या घराण्यांतल्या प्रमुखांपैकी एक होता),+
२२ आणि यहीएलीची मुलं जेथाम व योएल. हे यहोवाच्या मंदिरातल्या भांडारांवरचे अधिकारी होते.+
२३ अम्रामच्या, इसहारच्या, हेब्रोनच्या आणि उज्जियेलच्या वंशजांपैकी+
२४ शबुएल; तो गेर्षोमचा मुलगा होता आणि गेर्षोम हा मोशेचा मुलगा होता. शबुएल कोठारांवर नायक होता.
२५ त्याचे भाऊबंद, म्हणजे अलियेजरचे+ वंशज हे: रहब्याह,+ यशाया, योराम, जिख्री आणि शलोमोथ.
२६ शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद हे पवित्र केलेल्या वस्तूंच्या भांडारांवर अधिकारी होते.+ या वस्तू दावीद राजाने,+ तसंच घराण्यांच्या प्रमुखांनी,+ हजारांवर व शंभरांवर असलेल्या प्रमुखांनी आणि सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी पवित्र केल्या होत्या.
२७ त्यांनी, युद्धांतून+ आणि लुटीच्या मालातून+ मिळवलेल्या वस्तू यहोवाच्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी पवित्र केल्या होत्या.
२८ याशिवाय, शमुवेल द्रष्टा,*+ कीशचा मुलगा शौल, नेरचा मुलगा अबनेर+ आणि सरूवाचा मुलगा+ यवाब+ यांनी पवित्र केलेल्या सर्व वस्तू; तसंच इतरांनी पवित्र केलेल्या सर्व वस्तू शलोमीथ आणि त्याचे भाऊबंद यांच्याकडे सोपवण्यात आल्या.
२९ इसहारच्या वंशजांपैकी+ कनन्या आणि त्याची मुलं यांच्यावर देवाच्या मंदिराबाहेरच्या इतर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या; त्यांना इस्राएलवर अधिकारी आणि न्यायाधीश+ म्हणून नेमण्यात आलं.
३० हेब्रोनच्या+ वंशजांपैकी, हशब्याह आणि त्याचे भाऊबंद असे एकूण १,७०० पुरुष इस्राएलचा कारभार पाहणारे अधिकारी होते. ते भरवशालायक असून यार्देनच्या पश्चिमेकडच्या प्रदेशात, यहोवाच्या सेवेशी व राजाच्या सेवेशी संबंधित असलेली सर्व कामं पाहायचे.
३१ हेब्रोनच्या वंशजांपैकी, यरीया+ हा त्यांच्या घराण्यांचा आणि कुळांचा प्रमुख होता. दावीदच्या शासनकाळाच्या ४० व्या वर्षी,+ दावीदच्या काही लोकांनी हेब्रोनच्या वंशजांमध्ये पराक्रमी आणि शूरवीर माणसांचा शोध घेतला. तेव्हा गिलादमधल्या याजेर+ इथे त्यांना तशी माणसं सापडली.
३२ यरीयाच्या भाऊबंदांची संख्या २,७०० इतकी होती. भरवशालायक असलेले हे पुरुष आपल्या घराण्यांचे प्रमुख होते. म्हणून दावीद राजाने त्यांना रऊबेनच्या व गादच्या वंशावर आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशावर नेमलं; खऱ्या देवाशी आणि राजाशी संबंधित असलेली कामं पाहण्यासाठी त्याने त्यांना नेमलं.