१ इतिहास ५:१-२६
५ इस्राएलचा पहिला मुलगा रऊबेन+ याच्या वंशजांची नावं खाली दिली आहेत. तो इस्राएलचा पहिला मुलगा असला, तरी प्रथमपुत्राचा हक्क इस्राएलचा मुलगा योसेफ याच्या मुलांना देण्यात आला.+ कारण, रऊबेनने आपल्या वडिलांचं अंथरूण भ्रष्ट* केलं होतं.+ आणि म्हणून वंशावळीत त्याची नोंद प्रथमपुत्राच्या हक्कानुसार करण्यात आली नाही.
२ यहूदा+ आपल्या सर्व भावांमध्ये महान होता; आणि जो नेतृत्व करणार होता तोही त्याच्याच वंशातून आला.+ पण तरीसुद्धा प्रथमपुत्राचा हक्क योसेफचाच होता.
३ इस्राएलचा प्रथमपुत्र रऊबेन याला हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी+ ही मुलं झाली.
४ योएलचे वंशज हे: शमाया, शमायाचा मुलगा गोग, गोगचा मुलगा शिमी,
५ शिमीचा मुलगा मीखा, मीखाचा मुलगा राया, रायाचा मुलगा बाल,
६ आणि बालचा मुलगा बैराह. बैराह हा रऊबेनच्या वंशजांचा प्रधान होता; अश्शूरचा राजा तिग्लथ-पिल्नेसर+ याने त्याला बंदी बनवून नेलं होतं.
७ त्याच्या भावांची नावं त्यांच्या घराण्यांप्रमाणे वंशावळीत नोंदवण्यात आली होती. ती अशी: त्यांच्यातला प्रमुख ईयेल; तसंच, जखऱ्या
८ आणि बेला; बेला हा आजाजचा मुलगा होता, आजाज हा शेमाचा आणि शेमा हा योएलचा मुलगा होता. बेलाचे वंशज अरोएरमध्ये+ आणि तिथून पुढे नबो व बाल-मोन+ इथपर्यंत राहायचे.
९ त्यांनी पूर्वेकडे, फरात नदीजवळ+ जिथे ओसाड रानाची सुरुवात होते तिथपर्यंत वस्ती केली. कारण, गिलाद प्रदेशात+ त्यांच्या शेरडामेंढरांची आणि जनावरांची संख्या खूप वाढली होती.
१० शौलच्या काळात, त्यांनी हागारी लोकांशी युद्ध करून त्यांना हरवलं. आणि ते गिलादच्या पूर्वेकडे असलेल्या संपूर्ण प्रदेशात त्यांच्या तंबूंमध्ये राहू लागले.
११ त्यांच्या शेजारी बाशानच्या प्रदेशात गादचे वंशज राहायचे; त्यांची वस्ती सलका+ इथपर्यंत होती.
१२ बाशानमध्ये योएल हा प्रमुख होता. आणि त्याच्या खालोखाल शाफाम, मग यानय व शाफाट हे होते.
१३ त्यांच्या वडिलांच्या घराण्यांतले त्यांचे भाऊ हे: मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर, असे एकूण सात भाऊ.
१४ ही सर्व अबीहईलची मुलं होती. अबीहईल हा हूरीचा मुलगा होता; हूरी यारोहचा, यारोह गिलादचा, गिलाद मीखाएलचा, मीखाएल यशीशायचा, यशीशाय यहदोचा आणि यहदो हा बूजचा मुलगा होता.
१५ अही हा त्यांच्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख होता; तो अब्दीएलचा आणि अब्दीएल गूनीचा मुलगा होता.
१६ ते सगळे गिलादमध्ये,+ बाशानमध्ये+ व त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये राहायचे; तसंच शारोनची कुरणं जिथपर्यंत पसरली होती, तिथपर्यंतच्या सर्व प्रदेशात त्यांची वस्ती होती.
१७ यहूदाचा राजा योथाम+ आणि इस्राएलचा राजा यराबाम*+ यांच्या शासनकाळात या सगळ्यांची वंशावळीत नोंद करण्यात आली.
१८ रऊबेनचा व गादचा वंश आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्या सैन्यात ४४,७६० शूर योद्धे होते. या शूर योद्ध्यांकडे ढाली, तलवारी व धनुष्य असून त्यांना युद्धाचं प्रशिक्षण मिळालं होतं.
१९ त्यांनी हागारी,+ यतूर, नाफीश+ आणि नोदाब या लोकांशी युद्ध केलं.
२० या युद्धात त्यांनी मदतीसाठी देवाचा धावा केला, तेव्हा त्याने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांनी देवावर भरवसा ठेवला, म्हणून त्याने हागारी व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना त्यांच्या हाती दिलं.+
२१ त्यांनी त्यांची जनावरं, म्हणजे ५०,००० उंट; २,५०,००० मेंढरं; आणि २,००० गाढवं लुटली. तसंच, त्यांच्या १,००,००० लोकांना त्यांनी कैदही केलं.
२२ या युद्धात अनेक लोक मारले गेले; कारण, खरा देव त्यांच्या बाजूने लढत होता.+ त्यानंतर, बंदिवासात जाईपर्यंत ते त्यांच्या प्रदेशात राहिले.+
२३ मनश्शेच्या अर्ध्या वंशातले+ लोक बाशानपासून बालहर्मोनपर्यंतच्या प्रदेशात, तसंच सनीरच्या आणि हर्मोन पर्वताच्या+ प्रदेशात वस्ती करून राहिले. ते लोक संख्येने खूप जास्त होते.
२४ त्यांच्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख हे: एफर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्याह आणि यहदीएल. हे सर्व पुरुष शूर योद्धे असून नावाजलेले होते. ते आपापल्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख होते.
२५ पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाला विश्वासू राहिले नाहीत. देवाने त्या देशात त्यांच्यासमोर ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांची ते उपासना करू लागले.*+
२६ म्हणून, इस्राएलच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याला (म्हणजे, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिल्नेसर+ याला) रऊबेनच्या व गादच्या वंशांतल्या आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातल्या लोकांना बंदिवासात न्यायला प्रवृत्त केलं.+ अश्शूरच्या राजाने त्यांना हलह, हाबोर व हारा इथे आणि गोजान+ नदीकडे आणून वसवलं; आणि आजपर्यंत ते तिथेच राहत आहेत.
तळटीपा
^ किंवा “अशुद्ध.”
^ म्हणजे, यराबाम दुसरा.
^ किंवा “त्यांच्या दैवतांसोबत वेश्येसारखी कृत्यं करू लागले.”