व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १०

भविष्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

“नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”

स्तोत्र ३७:२९

“पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.”

उपदेशक १:४

“तो मृत्यू कायमचा काढून टाकेल; सर्वोच्च प्रभू यहोवा प्रत्येकाचे अश्रू पुसून टाकेल.”

यशया २५:८

“त्या वेळी, आंधळे पाहू लागतील, आणि बहिरे ऐकू लागतील. तेव्हा लंगडा हरणासारखा उड्या मारेल, आणि मुक्याची जीभ आनंदाने गीत गाईल. ओसाड प्रदेशात पाण्याचे प्रवाह उफाळून बाहेर येतील, आणि वाळवंटात झरे फुटतील.”

यशया ३५:५, ६

“तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही. कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”

प्रकटीकरण २१:४

“ते घरं बांधतील आणि त्यांत राहतील, ते द्राक्षांचे मळे लावतील आणि त्यांचं फळ खातील. त्यांनी बांधलेल्या घरांत दुसरे येऊन राहतील, असं कधीही होणार नाही. आणि त्यांनी लावलेल्या द्राक्षमळ्यांचं फळ दुसरे खातील, असं कधीही होणार नाही. कारण माझ्या लोकांचं आयुष्य झाडांच्या आयुष्याएवढं होईल, आणि माझे निवडलेले लोक जे काही काम करतील, त्यापासून त्यांना खूप आनंद मिळेल.”

यशया ६५:२१, २२