प्रश्न ७
आपल्या काळाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?
“एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल . . . या सगळ्या गोष्टी संकटांची फक्त सुरुवात असेल.”
“पुष्कळ खोटे संदेष्टे उठून बऱ्याच जणांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल.”
“जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.”
“मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील. तसंच, भयानक दृश्यं आणि आकाशात मोठी चिन्हं दिसतील.”
“शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक फक्त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, देवाची भक्ती करायचा फक्त दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे असे असतील.”