आम्हाला हिंमत दे
१. वेढले भीतीने
ना मार्गही दिसे,
तू धरून हात माझा,
नेशील मला पुढे.
वाट जीवनाची
आहे कठिण जरी,
एकनिष्ठ तू यहोवा
तू माझ्या संगती!
(कोरस)
यहोवा दे विश्वास असा
मला तू पाहू दे,
सोबती आम्हाला असंख्य
वैरी हे मोजके,
हिंमत, दे मला तू
धैर्याने सोसण्या,
यहोवा दे तू हिंमत
विजय अटळ तुझा.
२. मी अशक्त मानव
वाटे भीती मला,
अविचल तू दुर्ग माझा
देतोस बळ सदा.
धैर्य दे मनाला
जाणीव ही मला,
ना समर्थ कैद करण्या
मरणही मला.
(कोरस)
यहोवा दे विश्वास असा
मला तू पाहू दे,
सोबती आम्हाला असंख्य
वैरी हे मोजके,
हिंमत, दे मला तू
धैर्याने सोसण्या,
यहोवा दे तू हिंमत
विजय अटळ तुझा.
(कोरस)
यहोवा दे विश्वास असा
मला तू पाहू दे,
सोबती आम्हाला असंख्य
वैरी हे मोजके,
हिंमत, दे मला तू
धैर्याने सोसण्या,
यहोवा दे तू हिंमत
विजय अटळ तुझा.
यहोवा दे तू हिंमत
विजय अटळ तुझा.