जगू या साधं
१. दुनिया भासे ही चंदेरी,
वाटे हवं-हवं सारं काही.
पण गुंतलो जर व्यापात या,
ना राहील वेळ देण्या याहा.
(कोरस)
जगू या साधं,
याहा जाणे गरजा,
जगू या साधं नि आनंदी.
जगू या साधं,
नको ते पाश काही,
जगू या साधं नि आनंदी.
२. दिलंय त्याने राहण्या छत,
पोटाला देई तो भाकर.
थोड्यात राहिलो जर आनंदी,
नसेल कशाचाही कमी.
(कोरस)
जगू या साधं,
याहा जाणे गरजा,
जगू या साधं नि आनंदी.
जगू या साधं,
नको ते पाश काही,
जगू या साधं नि आनंदी.
(जोडणाऱ्या ओळी)
ना सोपं जीवन असं,
पण यहोवा पाठीशी.
दे दाणे जो पाखरां,
सोडेल का तो तुला,
तोच खरा आधार.
३. जीवन साधं समाधानाचं,
ना मनावर कशाचंही ओझं.
उद्याची पर्वा ती नको आता,
करू या आनंदी याहाला.
(कोरस)
जगू या साधं,
याहा जाणे गरजा,
जगू या साधं नि आनंदी.
जगू या साधं,
नको ते पाश काही,
जगू या साधं.
(कोरस)
जगू या साधं,
याहा जाणे गरजा,
जगू या साधं नि आनंदी.
जगू या साधं,
नको ते पाश काही
जगू या साधं नि आनंदी.