तारुण्यात यहोवाची सेवा कर
१. सोनेरी सुंदर, होते ते बालपण
चंदेरी क्षण, आनंदाचे.
उत्तर द्यायचं, अन् सेवेला जायचं,
प्रार्थना रोज नेमाने.
(प्री-कोरस २)
पण वाटे हे व्यर्थ ही धडपड, येई मनात हे,
नाही ऐकत जर कोणी तरी का मी जाऊ सेवेला?
तरी घे तू मेहनत, करण्या मनाने ही सेवा,
हाती दे हात तू याहाच्या,
तुला साथ देईल तो.
(कोरस)
तू आहे मोलाचा प्रिय याहाचा, राही सोबत तो,
अन् खूप सारे आहे करण्या, सेवेत त्याच्या.
ना सोडेल याहा साथ, देईल आशीर्वाद.
२. तरुणपणाचा हा मार्ग ना सोपा,
एकाकी मन, बावरलेले.
दिसे मार्ग ना यातून काही,
सांग तू, याहाला सारं.
(प्री-कोरस २)
मानू नको हार तू, लढ तू, ठेव पुढे नजर तू,
सेवा तू कर, होशील मनी तू आनंदी.
तरी घे तू मेहनत, करण्या मनाने ही सेवा,
हाती दे हात तू याहाच्या, तुला साथ देईल तो.
(कोरस)
तू आहे मोलाचा प्रिय याहाचा, राही सोबत तो,
अन् खूप सारे आहे करण्या, सेवेत त्याच्या.
ना सोडेल याहा साथ, देईल आशीर्वाद.
(जोडणाऱ्या ओळी)
तारुण्यात कर, सेवा याहाची,
पाठीशी आम्ही, नाही एकटा तू कधी.
(कोरस)
तू आहे मोलाचा प्रिय याहाचा, राही सोबत तो,
अन् खूप सारे आहे करण्या, सेवेत त्याच्या.
ना सोडेल याहा साथ, देईल आशीर्वाद.
(जोडणाऱ्या ओळी)
तारुण्यात कर, सेवा याहाची,
पाठीशी आम्ही, नाही एकटा तू कधी.
तारुण्यात कर, सेवा याहाची,
पाठीशी आम्ही, नाही एकटा तू कधी.