मी वाहिलं जीवन तुला!
१. अंधारात रातीच्या,
ताऱ्यांच्या वेली नभात,
साक्ष देती त्या, तुझ्या मायेची,
किती तुझे उपकार.
२. हे देवा तुझ्याविना,
दाखवेल कोण दिशा?
मनाला माझ्या, पारखून याहा,
जीवनाला दे आकार.
(कोरस)
दीप तू लावलास,
तो आशेचा,
जगाच्या काळोखात.
दिला तू एकुलता,
माझ्यासाठी,
मी वाहिलं याहा,
माझं जीवन तुला!
३. समजुनी अनमोल मला,
घेतलंस तू कुशीत बापा.
कोवळ्या उन्हात, प्रेमाच्या तुझ्या,
बहरेन मी सदा.
(कोरस)
दीप तू लावलास,
तो आशेचा,
जगाच्या काळोखात.
दिला तू एकुलता,
माझ्यासाठी,
मी वाहिलं याहा,
माझं जीवन तुला!!
(कोरस)
दीप तू लावलास,
तो आशेचा,
जगाच्या काळोखात.
दिला तू एकुलता,
माझ्यासाठी,
मी वाहिलं याहा,
माझं जीवन तुला!!