व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा महिमा करा!

यहोवाचा महिमा करा!

(स्तोत्र ९६:८)

  1. १. वैभवी देव तू यहोवा,

    स्वर्गी राजासन तुझं.

    फेडू कसं ऋण तुझं मी,

    दिलंस तू मला हे जीवन.

    भव्य ते आकाश देई,

    तुझ्या शक्‍तीची ग्वाही.

    मी मातीने बनलेला,

    करतोस तरी तू काळजी!

    (कोरस)

    देवा याहा, गातो मी गीत हे,

    गीत स्तुतीचं तुझ्या!

    राजा माझा तू सर्वकाळाचा,

    नाही देव असा कोणी,

    गौरवेन तुलाच मी!

  2. २. माझ्या जगण्याने हे देवा,

    व्हावं तुझं गुणगान.

    देव भला तू यहोवा,

    वर्णीन तुझी कार्यं महान.

    मैत्रीचा तुझ्या मला याह,

    आहे खरा अभिमान.

    देतोस तू बळ माझ्या हातां,

    आणि दिशा पावलांना.

    (कोरस)

    देवा याहा, गातो मी गीत हे,

    गीत स्तुतीचं तुझ्या!

    राजा माझा तू सर्वकाळाचा,

    नाही देव असा कोणी,

    गौरवेन तुलाच मी!

  3. ३. सूर्य नि चंद्र नि तारे,

    सागर विशाल ते सारे.

    साक्षी तुझ्या प्रेमाचे ते,

    पाहून त्यां आनंद वाटे.

    दिलं सारं तू हे आम्हा,

    रचलं तुझ्या बुद्धीने,

    गौरव तुझा किती गाऊ,

    शब्द पडतील अपुरे!

    (कोरस)

    देवा याहा, गातो मी गीत हे,

    गीत स्तुतीचं तुझ्या!

    राजा माझा तू सर्वकाळाचा,

    नाही देव असा कोणी,

    गौरवेन तुलाच मी!

(स्तो. ९६:१-१०; १४८:३, ही वचनंसुद्धा पाहा.)