येशू माझा मेंढपाळ
१. पाहतो मागे जेव्हा,
मिळे शांती मना.
निवडली नाही,
मी जगाची संगत.
ते येशूचे शब्द,
ठरले सहारा.
मिळालेला तो,
योग्य सल्ला मला.
(प्री-कोरस)
का मी तो आवाज ऐकू,
जो नेई अनोळखी वाट?
का मी सोडू तो हात,
नेहमी देई जो साथ?
(कोरस)
येशू माझा मेंढपाळ.
दाखवी तो सत्याची वाट.
आशेचा प्रकाश तो.
ऐकेन त्याची हाक,
प्रलोभने लाख,
ना सोडे तो मला, एकटा.
२. भावाबहिणींची भेट,
प्रेमाचा पुरावा.
दिली याहाने,
सर्वकाळची आशा.
येशू तारणहारा,
तो सांभाळी मला.
ना भीती कोणाची,
देई निवारा.
(प्री-कोरस)
का आवाज तो ऐकू,
जो नेई अनोळखी वाट?
का मी सोडू तो हात,
नेहमी देई जो साथ?
(कोरस)
येशू माझा मेंढपाळ.
दाखवी तो सत्याची वाट.
आशेचा प्रकाश तो.
ऐकेन त्याची हाक,
प्रलोभने लाख,
ना सोडे तो मला, एकटा.
(कोरस)
येशू माझा मेंढपाळ.
दाखवी तो सत्याची वाट.
आशेचा प्रकाश तो.
ऐकेन त्याची हाक,
प्रलोभने लाख,
ना सोडे तो मला, एकटा.
येशू माझा मेंढपाळ.
सोडे ना तो कधीही मला, मला.