विश्वासाने ताकदवान
१. का भिऊ मी त्या सिंहा?
का मी भिऊ वैऱ्याला?
माझा पाठीराखा याह,
ना मी कायर, लाचार.
ना मानेन कधी मी हार!
(कोरस)
विश्वासाने दिसे डोळ्यांस माझ्या,
सरून रात, येईल नवी पहाट.
ना घेईन कधी माघार,
आहे याहाची साथ.
जाणवे तो सोबती सदा—
विश्वासाने.
२. गेले होऊन जे सेवक
एकनिष्ठ याहाचे.
त्यांचा धीर नि विश्वास,
ना तो विसरणार.
उठतील ते इनाम घेण्या!
(कोरस)
विश्वासाने दिसे डोळ्यांस माझ्या,
सरून रात, येईल नवी पहाट.
ना घेईन कधी माघार,
आहे याहाची साथ.
जाणवे तो सोबती सदा—
विश्वासाने.
(जोडणाऱ्या ओळी)
विश्वासाने, पर्वतांना नमवीन.
विश्वास माझ्या आशेचा प्राण.
आहे जरी मीही निर्बळ मानव तरी,
विश्वासाने मी ताकदवान!
३. सुंदर किती ते जीवन,
देईल जे याह मला.
पाहीन वाट मी,
नाही दूर वेळ ती.
जवळ याहाचा विजय आता!
(कोरस)
विश्वासाने दिसे डोळ्यांस माझ्या,
सरून रात, येईल नवी पहाट.
ना घेईन कधी माघार,
आहे याहाची साथ.
जाणवे तो सोबती सदा—
विश्वासाने,
विश्वासाने.
(इब्री ११:१-४० सुद्धा पाहा.)