व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हाती यहोवाचा हात

हाती यहोवाचा हात
  1. १. नवा हा दिवस अन्‌ एक संधी नवीन,

    याहाच्या नावाची स्तुती करण्याची.

    रोखण्या पाहती विरोधी जरी.

    आग हृदयातली रोखू कशी?

    (कोरस)

    धुके उन्हात जसे, जाते क्षणात भीती विरून.

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?

  2. २. आहे समाधान आज मनाला माझ्या,

    ना शांत राहिलो मी संधी येता.

    घालण्या आता पाणी त्या रोपाला,

    धैर्य दे मला तू, हे देवा याहा.

    (कोरस)

    धुके उन्हात जसे, जाते क्षणात भीती विरून.

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    जरी चालतो आज अंधारली वाट,

    ना घेईन माघार, ना मानेन हार!

    डोळ्यांपुढे ठेवेन आशा,

    नि सांगेन सर्वां याहाचा महिमा.

    एकटा ना मी लढाईत या,

    भावांची साऱ्‍या साथ मला.

    विश्‍वासाने आम्ही जिंकू लढा,

    ना दूर याहाचा तो दिन आता!

  3. ३. यहोवाचे आभार मी मानतो,

    प्रेमाने रोज तो मला राखतो.

    ना चिंता उद्याची काही मला,

    आहे सोबती तो मेंढपाळ माझा!

    (कोरस)

    धुके उन्हात जसे, जाते क्षणात भीती विरून.

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?

    हाती यहोवाचा हात, तर का मी भिऊ?