जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका ऑगस्ट २०१६
नमुना सादरीकरणं
T-35 पत्रिकेसाठी आणि देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकासाठी नमुना सादरिकरणे. या सादरिकरणांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचे सादरिकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
सर्वसमर्थाच्या गुप्त स्थली वस्ती करा
यहोवाचे गुप्त स्थल काय आहे, आणि तिथं आपल्याला सुरक्षा कशी मिळते (स्तोत्र ९१)
ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला समर्पण करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत करा
ही आध्यात्मिक ध्येयं का महत्त्वाची आहेत? तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला ती गाठण्यास कशी मदत करू शकता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या
स्तोत्र ९२ मधील वचनांत आपण पाहतो की धार्मिक व्यक्ती वृद्धावस्थेतदेखील आध्यात्मिक रूपानं बहरू आणि फळ देऊ शकतात.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो
स्तोत्र १०३ मध्ये दावीद यहोवाच्या दयेचा गुण समजावण्यासाठी उदाहरणांचा वापर करतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“परमेश्वराचे उपकारस्मरण करा”
स्तोत्र १०६ मधील वचनं आपल्याला आपल्या हृदयात देवासाठी कृतज्ञतेची भावना वाढवण्यास आणि जोपासण्यास मदत करतील.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?
स्तोत्रकर्त्याने यहोवाला आपली कृतज्ञता दाखवण्याचा कसा निश्चय केला? (स्तोत्र ११६)