व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा

मंडळीच्या सभा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. (स्तो २२:२२) यहोवाची उपासना करण्यासाठी जे सभांना उपस्थित राहतात त्यांना आनंद मिळतो आणि बरेच आशीर्वाद अनुभवता येतात. (स्तो ६५:४) सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे बायबल विद्यार्थी लवकर प्रगती करू शकतो.

सभेला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता? त्यांना सभेला यायचं प्रोत्साहन देत राहा. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  हा व्हिडिओ त्यांना दाखवा. त्यांना सभेला आल्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांबद्दल सांगा. (कायम आनंद घ्या! धडा १०) सभेत शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगा किंवा पुढच्या सभेत आपण काय-काय शिकणार आहोत याबद्दल थोडी माहिती द्या. सभेत ज्या प्रकाशनांवर चर्चा केली जाईल ती प्रकाशनं त्यांना द्या. तसंच, त्यांना सभांना यायला मदत करा. कदाचित तुम्ही तुमच्या गाडीतून त्यांना सभांना घेऊन येऊ शकता. विद्यार्थ्याने पहिल्यांदा सभेला येण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेता, तिचे तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील.—१कर १४:२४, २५.

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा, हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा:

  • जेडला सभेला बोलवण्यासाठी निताने मिळालेल्या संधीचा कसा उपयोग केला?

  • बायबल विद्यार्थी सभेला येतो तेव्हा आपल्याला आनंद का होतो?

  • “देव खरंच तुमच्यामध्ये आहे”

    जेड पहिल्यांदा सेभेला आली तेव्हा तिने काय अनुभवलं?