३-९ जानेवारी
शास्ते १५-१६
गीत १८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“विश्वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
शास १६:१-३—शमशोन वेश्येच्या घरी का थांबला? (टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २७ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास १६:१८-३१ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: चिंतेचा सामना कसा करावा?—स्तो १४५:१८, १९ हा व्हिडिओ दाखवा व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहू या असं सांगा. (पण व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
आमचा विवाह बायबलमुळे टिकून राहिला: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: विवाहात समस्यांचा सामना करत असताना दोन्ही जोडप्यांना कोणत्या बायबल तत्त्वांमुळे मदत झाली? उपासनेशी संबंधित गोष्टी करत राहिल्यामुळे त्यांना कशी मदत झाली? ‘आमच्या समस्या कधीच सुटणार नाहीत’, असा विचार जोडप्यांनी का करू नये? विवाहित जोडपी कोणाची मदत घेऊ शकतात?—याक ५:१४, १५.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मी.) आनंदाची बातमी! पाठ १४, प्रश्न ३-४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४७ आणि प्रार्थना