व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा

यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा

एका व्यक्‍तीमध्ये सत्याचं बी वाढवण्याचं काम यहोवा करतो. (१कर ३:६-९) म्हणून शिष्य बनवण्याच्या कामात यशस्वी होण्यासाठी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे.

आपल्या विद्यार्थ्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याबद्दल आपण यहोवाला सांगितलं पाहिजे आणि त्याने विद्यार्थ्याला मदत करावी अशी विनंतीही आपण केली पाहिजे. (फिलि १:९, १०) तुम्हाला कोणत्या बाबतीत मदत हवी आहे त्याबद्दल यहोवाशी स्पष्टपणे बोला. योग्य पद्धतीने विचार करता यावा आणि योग्य ती पावलं उचलता यावी म्हणून पवित्र शक्‍ती मागा. (लूक ११:१३) विद्यार्थ्याला प्रार्थना कशी करावी हे शिकवा आणि ती नेहमी करण्याचं प्रोत्साहन त्याला द्या. त्याच्यासोबत किंवा व्यक्‍तिगत प्रार्थना करताना त्याचं नाव घेऊन प्रार्थना करा.

‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—प्रार्थना’  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • नितासमोर कोणती समस्या आली?

  • १ करिंथकर ३:६ या वचनातून निताला कशी मदत मिळाली?

  • निताची समस्या कशी सुटली?