व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं

पवित्र शक्‍तीमुळे एक अवघड काम शक्य झालं

सुरुवातीपासूनच यहोवाच्या लोकांनी मोठमोठी कामं केली आहेत. ही कामं ते स्वतःच्या क्षमतांमुळे नाही तर यहोवाच्या मदतीमुळे करू शकले आहेत. १९५४ मध्ये एक फिल्म बनवण्यात आली. तिचं नाव होतं रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना.  बेथेलमध्ये काम करणाऱ्‍या भाऊ-बहिणींनी ही फिल्म तयार केली. पण फिल्म बनवण्याबद्दल त्यांना काहीच अनुभव नव्हता. हे अवघड काम ते फक्‍त यहोवाच्या शक्‍तीमुळेच करू शकले. या भाऊबहिणींच्या अनुभवातून आपला भरवसा वाढतो, की आपण जर यहोवावर विसंबून राहिलो तर आपल्यावर सोपवलेलं कोणतंही काम किंवा नेमणूक आपण पूर्ण करू शकतो.—जख ४:६.

रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटनाही फिल्म कशी बनवण्यात आली   हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बांधवांनी जागतिक मुख्यालयावर फिल्म बनवण्याचा निर्णय का घेतला?

  • बेथेलमध्ये काम करणारे भाऊ-बहीण एका शरीरातल्या अवयवांसारखे आहेत, हे या फिल्ममधून कसं दाखवण्यात आलं?—१कर १२:१४-२०

  • बांधवांसमोर कोणत्या अडचणी आल्या आणि त्यांनी त्या कशा हाताळल्या?

  • या व्हिडिओतून आपल्याला यहोवाच्या पवित्र शक्‍तीबद्दल काय शिकायला मिळतं?