नमुना सादरीकरणं
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35)
प्रश्न: सर्वांनाच मरणाची भीती वाटते. आपल्या लोकांसोबत, आपण कायम जगावं अशी आपली सर्वांची इच्छा असते. तुम्ही अशा वेळेची कल्पना करू शकता का, जेव्हा आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही?
वचन: योहान ५:२८, २९
सादरता: या पत्रिकेत त्या सृष्टिकर्त्याचं वचन दिलं आहे, ज्याने आपल्याला जीवन दिलं आहे. तो मृत व्यक्तीला परत जिवंत करू शकतो. [जर घरमालकाकडे इंटरनेटची सोय असेल तर jw.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या, टेहळणी बुरूज क्र. ३ २०१६ च्या सार्वजनिक आवृत्तीबद्दल किंवा जब आपका कोई अपना मर जाए या माहितीपत्रकाबद्दल सांगा.]
सत्य शिकवा
सत्य: आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रेम आणि आदर गरजेचं आहे. [जर घरमालकाकडे इंटरनेटची सोय असेल तर jw.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेलं तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हे माहितीपत्रक दाखवा.]
जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? (kt)
प्रश्न: ज्या वेळी जीवनात खूप समस्या येतात आणि आपण तणावात असतो तेव्हा सांत्वन मिळवण्यासाठी आपण सहसा देवाला प्रार्थना करतो. पण देव आपल्या सर्वच प्रार्थना ऐकतो का?
वचन: १ योहा. ५:१४
सादरता: आपली प्रार्थना देवाने ऐकावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते या पत्रिकेत सांगितलं आहे. [जर घरमालकाने आवड दाखवली तर त्याला बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा.]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.