व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

काळजीपूर्वक मित्र निवडा

काळजीपूर्वक मित्र निवडा

मवाबाच्या मैदानात इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. (१कर १०:६, ८, ११) मवाबच्या स्त्रिया अनैतिक कामं आणि मुर्तिपूजा करायच्या. काही इस्राएली लोकांनी या स्त्रियांसोबत मैत्री करायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी गंभीर पाप केलं आणि त्याचा खूप वाईट परिणाम त्यांना भोगावा लागला. (गण २५:९) आज आपल्याला अशा लोकांसोबत राहवं लागतं जे यहोवाची उपासना करत नाहीत. त्यापैकी काही जण कदाचित आपले नातेवाईक किंवा ओळखीचे लोक असतील. तसंच कामावर, शाळेत किंवा शेजारीसुद्धा बऱ्‍याच लोकांसोबत आपल्याला वेळ घालवावा लागतो. अशा लोकांसोबत जास्त मैत्री केल्यामुळे आपल्यालाही इस्त्राएली लोकांप्रमाणे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • जिम्री आणि इतर लोक यामीनला कोणती चुकीची गोष्ट पटवून द्यायचा प्रयत्न करत होते?

  • फिनहासने यामीनला योग्य दृष्टिकोन बाळगायला कशी मदत केली?

  • विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तींशी मैत्रीपूर्ण वागणं आणि त्यांच्याशी मैत्री करणं यात काय फरक आहे?

  • मंडळीतसुद्धा आपण विचार करून मित्र का निवडले पाहिजेत?

  • अनोळखी लोकांसोबत आपण सोशल मिडियावर चॅट करायचं का टाळलं पाहिजे?