२६ मार्च-१ एप्रिल
मत्तय २५
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“जागृत राहा”: (१० मि.)
मत्त २५:१-६—पाच समजदार आणि पाच मूर्ख कुमारी वराला भेटायला बाहेर गेल्या
मत्त २५:७-१०—वर येतो तेव्हा मूर्ख कुमारी तिथे नसतात
मत्त २५:११,१२—फक्त समजदार कुमारींना लग्नाच्या मेजवानीसाठी आत घेतलं गेलं
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त २५:३१-३३—मेंढरांचा आणि बकऱ्यांचा दाखला समजावून सांगा (टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. २७ परि. ७)
मत्त २५:४०—ख्रिस्ताच्या बांधवांशी असलेली मैत्री तुम्ही कशा प्रकारे दाखवू शकता? (टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. १६-१७ परि. १६-१८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २५:१-२३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा. स्मारकविधीचं आमंत्रण द्या.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. २७ परि. ७-१०—विषय: मेंढरांच्या आणि बकऱ्यांच्या दाखल्यात प्रचारकार्यावर कशा प्रकारे भर देण्यात आला आहे?
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं”: (१० मि.) चर्चा. त्यानंतर व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा. या व्हिडिओत दाखवलं आहे की, प्रचारक आपल्या बायबल विद्यार्थ्याला अभ्यासासाठी कशी तयारी करावी हे शिकवतो. श्रोत्यांना विचारा की, आपल्या विद्यार्थ्याला बायबल अभ्यासाची तयारी करण्यासाठी आणखी कोणकोणत्या परिणामकारक पद्धती त्यांनी वापरल्या आहेत.
पाहुण्यांचं स्वागत करा: (५ मि.) मार्च २०१६ च्या जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिकेच्या लेखावर आधारित भाषण. २०१७ दरम्यान स्मारकविधीच्या वेळी आलेले काही चांगले अनुभव सांगा. ३१ मार्चला होणाऱ्या स्मारकविधीदरम्यान सभागृहात येण्या-जाण्याबद्दल, तसंच गाड्या पार्क करण्याच्या व्यवस्थेबद्दल योग्य त्या सूचना द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. ५-१५, पृ. १७२ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना