एकटेपणावर उपाय—मैत्री—बायबलमुळे कशी मदत होऊ शकते?
एकटेपणा ही जगभरात मोठी आणि गंभीर आरोग्याची समस्या बनत चालली आहे. याविरुद्ध लढणं आणि त्यावर उपाय शोधणं हे २०२३ मध्ये सर्वात महत्त्वाचं बनलंय. पण एकटेपणावर खरंच काही उपाय आहे का?
“अमेरिकेतले जनरल सर्जन डॉ. विवेक मूर्ती म्हणतात: “आपल्याला जेव्हा एकटेपणा जाणवतो आणि आपण स्वतःला इतरांपासून दूर ठेवतो, तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी घातक तर ठरतंच, पण त्याचा आपल्या स्वभावावर किंवा रोजच्या जीवनावरही परिणाम होतो.” पण ते पुढे असंही म्हणतात: “आपण यावर मात करू शकतो.” पण कशी? “प्रत्येक दिवशी इतरांसोबतच्या आपल्या नात्याची वीण घट्ट करून.” a
इतरांपासून वेगळं राहिल्यामुळेच एकटेपणा जाणवतो असं नाही, तर काहींना लोकांमध्ये असतानाही एकटेपणा जाणवू शकतो. एकटेपणाचं कारण काहीही असलं तरी बायबल आपल्याला नक्की मदत करू शकतं. इतरांशी आपली मैत्री घट्ट करून आपण एकटेपणाशी कसं लढू शकतो, याबद्दल त्यात व्यावहारिक सल्ले दिले आहेत.
मदत करणारी बायबल तत्त्वं
इतरांशी चांगला संवाद करणारे बना. याचा अर्थ, तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्त करा, पण त्यासोबतच इतरांचं ऐकून घ्यायलाही तयार राहा. तुम्ही इतरांमध्ये जितकी जास्त आवड घ्याल तितकीच तुमची नाती आणखी घट्ट होतील.
बायबलचं तत्त्व: “फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पैकर २:४.
जास्त लोकांसोबत मैत्री करा. तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा लहान असलेल्या लोकांशी मैत्री करा. त्यासोबतच वेगवेगळ्या संस्कृतीच्या किंवा देशाच्या लोकांशी मैत्री करायचा प्रयत्न करा.
बायबलचं तत्त्व: “तुमची मनं मोठी करा.”—२ करिंथकर ६:१३.
इतरांसोबतची मैत्री घट्ट कशी करायची याबद्दल आणखी माहितीसाठी “सॅटिस्फाइंग आवर हंगर फॉर फ्रेंडशिप.” हा इंग्रजीतला लेख पाहा.
a आवर एपीडेमिक ऑफ लोनलीनेस ॲण्ड आयसोलेशन: द यू.एस. सर्जन जनरल्स ॲडवायसरी ऑन द हिलींग इफेक्ट्स ऑफ सोशल कनेक्शन ॲण्ड कम्यूनिटी, २०२३.