जागे राहा!
लढाया कधी थांबतील का?—बायबल काय सांगतं?
“परिस्थिती आटोक्यात आणायची आणि धोका टाळायची हीच वेळए. आत्मसंयम दाखवून स्वतःला रोखून धरण्याची आत्ताच वेळए.” हे शब्द आहेत संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव ॲन्टोनियो ग्युटारेश यांचे. १३ एप्रिल २०२४ ला इराणने इस्राएलवर केलेल्या हल्ल्याबद्दल ते बोलत होते.
मध्यपूर्व देशांमध्ये चालू असलेल्या लढाया खरंतर संपूर्ण जगभरात जे चालू आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण आहेत.
“दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जितक्या लढाया आणि युद्धं लढली गेली, त्यांपेक्षा कितीतरी जास्त लढाया सद्ध्या या जगात चालू आहेत. आणि २०० कोटी लोक त्यामुळे प्रभावित झाले आहेत.”—संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद, २६ जानेवारी २०२३.
ज्या देशांमध्ये सशस्त्र संघर्ष किंवा लढाया चालू आहेत अशा देशांपैकी काही देश म्हणजे: इस्राएल, गाझा, सीरिया, अझरबायजान, युक्रेन, सुदान, इथिओपिया, नायजर, म्यानमार आणि हैती. a
या लढाया कधी थांबतील का? जागतिक नेते कधी खरी शांती आणू शकतील का? याबद्दल बायबल काय सांगतं?
संपूर्ण जग युद्धाच्या खाईत
आज जगभरात जी युद्धं चालु आहेत त्याबद्दल बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं. या लढाया खरंतर शेवटच्या काळाची चिन्हं आहेत आणि लवकरच ही सगळी युद्धं कायमची थांबणार आहेत. बायबलमधून आपल्याला कळतं, की आपण याच शेवटच्या काळात जगत आहोत. या काळाला बायबलमध्ये ‘जगाच्या व्यवस्थेची समाप्ती’ असं म्हटलं आहे.—मत्तय २४:३.
“तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल. . . . कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.”—मत्तय २४:६, ७.
लढायांमुळे बायबलमधली भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे याबद्दल आणखी माहितीसाठी “जगाचा अंत कधी होईल?” हा लेख वाचा.
हर्मगिदोन—या एका मोठ्या लढाईने सर्व लढायांचा अंत
बायबलमध्ये सांगितलंय की लवकरच या पृथ्वीवरून सगळ्या लढायांचा अंत होईल. पण हे कोणामुळे आणि कसं होईल? हे कोणत्याही माणसामुळे होणार नाही, तर ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धामुळे’ म्हणजे हर्मगिदोनच्या युद्धामुळे होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) यानंतर, देवाने सगळ्या माणसांना एका शांतीपूर्ण वातावरणात कायमचं जीवन देण्याचं जे वचन दिलंय ते पूर्ण होईल.—स्तोत्र ३७:१०, ११, २९.
याबद्दल आणखी माहितीसाठी “हर्मगिदोन म्हणजे काय?” हा लेख वाचा.
a ACLED इंडेक्स, “जगभरात सशस्त्र हिंसाचार आणि लढायांचा आलेख,” जानेवारी २०२४